▄ ▅ कोरोना पासून बचाव कसा कराल.▅ ▄
शासना तर्फे देण्यात आलेल्या सुट्ट्या मौज आणि गप्पा मारण्यासाठी नाहीत. तर आपण घरात राहून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आहे. याचे प्रत्यकाने भान ठेवावे. कोरोना विषाणूची लागण झाल्यास ते सर्वांच्याच आरोग्यासाठी अपायकारक आहे. अफवांना बळी पडू नका. गर्मी मुळे कोरोना विषाणू टिकत नाही हि बाब अजून सिद्ध झाली नाही. दारू पिल्या ने कोरोना पासून बचाव होतो हे साफ खोटं आहे. शेण खाल्याने आणि गोमूत्र पिल्याने कोरोना बरा होतो हा मूर्ख पणा आहे.
नियमित हात धुवा.
दिवसातून २० सेकंद नियमित पणे साबणाने हात धुवा. यामुळे हातावरील विषाणूंचा प्रतिबंध होतो.
नाक, तोंड, डोळ्यांना वारंवार हात लावू नका.
आपण अनेक वस्तुंना स्पर्श करतो त्यामुळे आपल्या हातावर विषाणू असतात.
सुरक्षित अंतर ठेवा.
ज्यांना सर्दी, खोकला असेल अशा लोकांपासून किमान ३ फूट अंतर ठेवा.
प्रवास सहसा टाळा.
कोरोना विषाणूचा जंतूसंसर्ग टाळण्यासाठी प्रवास टाळावा.